Saturday, September 25, 2010

इंग्लंडच्या महाराणीच्या मशालीमागे देश मूर्खपणे धावत आहे - पू. रामदेव बाबा यांची राष्ट्रकुल स्पर्धेवर टीका

जैसलमेर - राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्ताने देशभरात इंग्लंडची महराणी एलिझाबेथ हिने दिलेली मशाल (क्वीन्स बेटन) घेऊन नागरिक आणि खेळाडू धावत आहेत. ज्या इंग्रजांनी आपल्या देशातील लक्षावधी नागरिकांना क्रुरपणे ठार करून देशावर राज्य केले त्या गुलामगिरीच्या आठवणींना आठवणे, हा मूर्खपणा आहे, अशी टीका योगगुरु पू. रामदेव बाबा यांनी राष्ट्रकुल स्पर्धेवर केली. इंग्रजांनी राज्य केलेल्या जगातील ७० देशांच्या समुहाला राष्ट्रकुल म्हटले जाते. या राष्ट्रकुलाच्या स्पर्धेच्या आयोजनावर भारतात सहस्रो कोटी रुपयांचा चुराडा करण्यात येत आहे, अशीही टीका पू. रामदेव बाबा यांनी केली.



No comments:

Post a Comment

Popular Posts