Sunday, September 26, 2010

श्रावणझड


श्रावणझड बाहेर मी अंतरी भिजलेला
पंखी खुपसून चोच एक पक्षी निजलेला

अभ्रांचा हुदयभार थेंब थेंब पाझरतो
विझलेला लांबदिवस चिंब होत ओसरतो

उधळ उधळ पल्वलात संगळून जळ बसते
क्षणजीवी वर्तुळात हललेले भासविते

चळते प्रतिबिंब ज़रा स्थिर राहून थिजताना
बिंदुगणिक उठलेले क्षीण वलय विरताना

रिमझिम ही वारयासह स्थायी लय धरून असे
संमोहन निद्रतुन शब्द्दाना जाग नसे

: अनिल

No comments:

Post a Comment

Popular Posts