आकाशाच्या खिडकीतुन
सुर्य अलगद डोकवायचा,
गर्भरेशमी त्याची किरणं
आळसावलेल्या डोळ्यांनी मी टिपायचा.
त्याच्या येण्याने आभाळाला
लालसर झालर चढायची
तीच पांघरुन माझी जाग
ऊन्हे डोक्यावर येइतो झोपायची.
ऊन्हं वितळायला लागली
तेव्हा नकळत जाणवलं
अरे..सकाळची कोवळीक
आपण कधी अनुभवलीच नाही.
No comments:
Post a Comment