रस्ते खराब आहेत (खड्ड्यात रस्ते कि रस्त्यात खड्डे हे कळायला मार्ग नाही, कल्याण मधील रस्त्यांवर तर होडीतून प्रवास केल्यासारख वाटतं), पद पथाचा पत्ता नाही, गटार भरून वाहत आहेत, गटारांची झाकण मोडकळीस आलेली आहेत, काही ठिकाणी तर ती गायब झाली आहेत, कचरा वेळेवर उचलला जात नाही, कचरा पेटीच्या बाहेर ओसंडून वाहतो आहे, सर्वत्र दुर्गंधी आणि अस्वच्छता बोकाळली आहे.
आपण घरातून बाहेर पडल्यावर हि दृश्य सर्वत्र पाहतो, मग तेथील नगरसेवक / महापालिका अभियंता ह्यांना ह्या गोष्टी दिसत नाही काय? प्रत्येक विभागातील सत्ताधारी / विरोधी पक्षाचे विभागप्रमुख काय झोपा काढत आहेत काय? शहरात स्वच्छता राखणं हि पालिकेची / महानगरपालिकेची जबादारी आहे पण ते ती जबाबदारी पार पाडत नाही असच सध्या चित्र आ� [...]
No comments:
Post a Comment