Sunday, September 26, 2010

आणीबाणी


अश्या काही रात्री गेल्या
ज्यात काळवंडलो असतो...
अश्या काही वेळा आल्या
होतो तसे उरलो नसतो...

वादळ असे भरून आले
तरु भडकणार होते
लाटा अश्या घेरत होत्या
काही सावरणार नव्हते...

हरपून जावे भलतीचकडे
इतके उरले नव्हते भान
करपून गेलो असतो
इतके पेटून आले होते रान...

असे घडत होते डाव
असा खेळ उधळून द्यावा
विरस असे झाले होते
जीव पूरा विटून जावा...

कसे निभावून गेलो
कळत नाही कळत नव्हते
तसे काही जवळ नव्हते
नुसते हाती हात होते ...

: अनिल

No comments:

Post a Comment

Popular Posts