: तुला मी विसरु तरी कसे ? तुझ्या आठवनींना मिटवु तरी कसे ? माझ्या ह्रुदयात जे तुझ घर आहे ते घर मी माझ्याच हाताने पेटवु तरी कसे ? आजकालचं दुख:ही मला अनमोल आहे शेवटी ते तु दिलेलं आहे मग मी या निर्रथक अश्रुमागे त्याला लपऊ तरी कसे ? मनाचे ढगही दाटुन आलेत हे डोळेही अश्रुंचा मुका पाऊस बरसवु लागलेत या वेड्या मनाची तगमग या मनाचे निर्मळ स्वप्न मी तुला सांगु तरी कसे ? बघ आता विजा चमकु लागल्यात सोबत पावसाचाही जोर आहे सांग काय करु आता ? या वादळात बोलकी वळचण मी शोधु तरी कुठे ? ओठावर आलेले हे शब्द मागे फ़िरुऊ तरी कसे ? भर पावसातही कोरड्या या मनाला तुझ्या विरहाने भिजवु तरी कसे ? आता या पुढे तुझी सोबत नसल्यावर मग हे शब्दांचे रंग मी उधळु तरी कसे ? सांग तुला मी विसरु तरी कसे ??? |
.
__,_._,___
--
No comments:
Post a Comment