Sunday, September 27, 2009

पहिला पगार

पहिला पगार

आज दुपारी तो एस एम एस वाचून क्लोज करवेना,

बक अकाउंट मध्ये झाला पहिला पगार जमा,

काय करायचे त्याचे विचारचक्र सुरू झाले,

त्याच बरोबर मनात मागील आठवणींची गर्दी झाली.

आठवले ते दिवस कॅम्पस इंटरव्ह्यू चे,

आणि प्लेसमेंट साथी केलेल्या धडपडीचे...

रोज खेळ सुरू होता ऍप्टिट्यूड आणि टेक्निकल चा,

आज नाही तर उद्या पुन्हा लढा द्यायचा.

बेस्ट लक नेक्स्ट टाइम ऐकून कान जेव्हा थकले,

स्वतः वर विश्वास ठेव म्हणून ,हात मित्राने धरले.

एक सखा थांबून राहिला ,सिलेक्शन ची पार्टी देण्यासाठी.

दुसऱ्याने थोपवले सत्यनारायणाला माझ्या सिलेक्शन साथी.

आज च्या साठी बेस्ट लक असे रोज म्हणायचे सगळे,

सोबत होते आई वडिलांचे आशेने भरलेले डोळे,

एकच विचार दिवस भर डोक्यात भिनत होता,

रात्रीच्या स्वप्नातही तोच किरकिरत होता.

ठरवले तेव्हा आता यश मिळेपर्यंत झगडायचे.

डिप्रेशन ला आजच्या ,उद्याचे कॉन्फिडन्स बनवायचे.

कॉन्फिडन्स चा त्या अखेरीस विजय झाला,

ऑफर लेतर घेऊन एक दिवस माझाही आला.

आईने स्वतः वाचण्या आधी ते ठेवले समोर देवच्या.

आणि म्हणाली आज कष्टाच्या चीज झाले माझ्या लेकराच्या..

मग आप्तेटांचे फोन झाले गोड बातमी सांगायला .

पेढे झाले, पार्टी झाली, आनंद साजरा करायला,

त्यानंतर चातकासारखी जॉयनिंग ची वात बघत होतो

स्टुडंट मधून प्रोफेशनल व्हायला उतावळा झालो होतो.

सुख मिळण्या साठी, पैसे लागतात कमावायला,

की पैसे साठी सुख लागते गमावायला????

या प्रश्नाचे उत्तर हवे ज्याचे त्याने शोधायला.

.

__,_._,___



--
(¨`·.· ´)
`·.¸.·´

No comments:

Post a Comment

Popular Posts