पती, पत्नी आणि झोप
"पती, पत्नी आणि झोप"
तो या कुशीवर ती त्या कुशीवर
दोघांचीही डोकी आपापल्या उशीवर
पाठीकडे पाठ एका हाताचं अंतर
सध्यातरी अबोला माहीत नाही नंतर
विषय आता आठवत नाही पण सकाळी भांडण झालं होतं
जुन्याच कुठल्या मुद्द्याचा पुन्हा कांडण झालं होतं
कळत नाही अबोल्याचं झोपेशी काय नातं असतं
जांभया येतात खूप पण मन टक्क जागं राहतं
झोप येत नाही म्हणून तो घेतो कूस वळून
तिला वाटतं त्याचा राग गेलाय आता पार पळून
तिही मग कूस वळते तिरक्या डोळ्यांचा कटाक्ष देते
शब्दबंद ओठांवरती हळूच कातील हसू फुटते
पुढाकार कोणी घ्यायचा असं काहीच नसतं ठरलेलं
तहामध्ये दोघांचंही सारं निम्मं निम्मं उरलेले
आता भांडणं ढासळतात श्वासात श्वास मिसळतात
तृप्तीच्या डोहामध्ये दोघेही मग कोसळतात
झोप अडून बसलेली आता डोळ्यामध्ये शिरते
हलक्यानेच पापणीखाली अंधाराचं काजळ भरते
.
__,_._,___
--
(¨`·.· ´)
`·.¸.·´
No comments:
Post a Comment