अफाट होती तुझी स्मरणशक्ती | |||||
अफाट होती तुझी स्मरणशक्ती | |||||
तुला नेमके ठाऊक होते, एकमेकाना पहिल्यान्दा पाहीले | |||||
तेव्हा सुर्याचा पृथ्वीशी असलेला नेमका कोन | |||||
एकमेकान्च्या नजरेत हारवताना | |||||
आपन नक्की किती होतो एक का दोन? | |||||
तुला ठाऊक होते माझ्या कुठल्या शर्टला होती किती बटने? | |||||
कुठल्याचा उसवला होटा खिसा? | |||||
रात्रभर गाणी म्हणून दाखवताना | |||||
नेमका कितव्या गाण्याला बसला होता घसा | |||||
तुझ्याशी बोलताना चुकून जाम्भई निसटली | |||||
त्या दिवसाची तारीख, महिना, वर्ष, वेळ | |||||
आणी एकून किती मायक्रो सेकन्द टिकू शकला होता | |||||
मुश्किलीने एकमेकान्शी अबोला धरण्याचा खेळ | |||||
आठवतेका तुला रातरानी शेजारी बसून | |||||
कविता म्हणून दाखवताना | |||||
फुललेल्या एकूण कळ्यान्ची सन्ख्या | |||||
माझ्या अक्षराची पुस्तकात लिहीलेली मानसशास्त्रीय व्याख्या | |||||
नेमके आठवत होते तुला | |||||
कवितानी बोट टिकवले होते ते नेमके कुठल्या क्षणान्वर | |||||
आणी मनावरील पानावर कोरल्या गेल्यावरही | |||||
कुठली कविता कुठल्या पानावर | |||||
अफाट होती तुझी स्मरनशक्ती | |||||
मलाच कसेकाय विसरलीस कुणास ठाऊक? | |||||
--
(¨`·.· ´)
`·.¸.·´
No comments:
Post a Comment