Sunday, September 27, 2009

याला प्रेम म्हणायच असतं…

याला प्रेम म्हणायच असतं…
उगाचच्या रुसव्यांना, तु मला मनवण्याला,
प्रेम म्हणायचं असतं
एकमेका आठवण्याला, आणि आठवणी जपण्याला,
प्रेम म्हणायचं असतं.
थोडसं झुरण्याला, स्वतःच न उरण्याला,
प्रेम म्हणायचं असतं
भविष्याची स्वप्न रंगवत, आज आनंदात जगण्याला,
प्रेम म्हणायचं असतं
कितीही रागावलं तरी, एकमेका सावरण्याला,
प्रेम म्हणायचं असतं
शब्दातुन बरसण्याला, स्पर्शाने धुंद होण्याला,
प्रेम म्हणायचं असतं
तुझं माझं अस न राहता, 'आपलं' म्हणून जगण्याला,
प्रेम म्हणायचं असतं
प्रेमाला प्रेम म्हणत फ़क्त प्रेमच करण्याला
प्रेम म्हणायचं असतं

.

__,_._,___


--
(¨`·.· ´)
`·.¸.·´

No comments:

Post a Comment

Popular Posts