Saturday, October 17, 2009

अपमानाच दलदल ……..

अपमानाच दलदल ……..

आयुष्य सरत चाललय
ओल्या जखमां घेऊन
अपमानाच दलदल
बदल्याची भावना घेऊन

तुझ्याच हातात आहे
अभिमानाचा लगाम
सुकलेल्या खपल्या
उकरण कीवां फ़ुकंर घालून
सुकवण.
तुझ्याच हातात आहे……

अपमान चिघळत बसण
नेहमीच कठीण जात
तो गिळून टाकावा…..
अन द्यावा ढेकर,
निरागसतेचा…….

मी खर सांगू …..
तुझं माझ काही जात नाही
इथे हरवतात ते फ़क्त क्षण
हवा असतो तुझा हसरा सहवास.
आणी सोबत….तु पण

पण तुझ्यात असते ओढ
बदल्याची ……..
चोविस तास वेळ तुझ्या
खटल्याची …….

उब आलाय आता मला
तुझ्या अस्तिव्ताच्या धड्यांचा
मी शून्य होऊन जगलोच ना
कधी केला का प्रश्न या बेड्यांचा ?

मी स्वीकारत आलोय तुला
तुझ्या अहंकारा सकट
पण आज कळतय
सगळच जातय फ़ुकट…..

No comments:

Post a Comment

Popular Posts