Saturday, October 17, 2009

अश्रू रे माझे…..

अश्रू रे माझे…..


हा बघ एक अश्रू ओघळला
मनाची वेस ,पापण्यांचा उंबरा ओलांडून,
पण माहीत आहे मला हे
तू कुठेही राहशील पण…
असणार माझाच आणि देणार
मला थोडी जागा तुझ्या मनाच्या कोपर्‍यात,
पण हे अश्रू घाबरतात ना
तू मला विसरलास तर?????
मग माझे डोळे होतील दुखाने कायम बंद
आणि मग ते बेघर होतील ना….
अश्रू रे माझे…..

No comments:

Post a Comment

Popular Posts