Saturday, October 17, 2009

घन तुझ्या आठवांचा आज बरसात करे

घन तुझ्या आठवांचा आज बरसात करे

घन तुझ्या आठवांचा आज बरसात करे
मन होउनीया पाणी आज अंगणात झरे
मज नको ती कहाणी, नको पुन्हा तीच गाणी
सर ओली, तो शहारा गात अंतरात फिरे

होई आवाज कापरा संग थरथरे धरा
धरा धरा रे चांदणे, जरा आभाळ सावरा
अशी विझेल ही रात पुन्हा भरतील डोळे
बघ आसवे निघाली पुन्हा जपत चेहरे

मनी फिरते पाखरु त्याचे हरवले घर
त्याची भिजते नजर संग ओलावले पर
काजळाचा रंग त्याच्या काळजात मिळे
तव गंध काजळाचा सा-या रानात पसरे

जरा दाटतो काळोख जरा पुसतो ओळख
क्षणभर दावी खुणा विजांचा मालक
तिचे वाजते पाऊल तशी लागते चाहुल
उधळती येत रात, पुन्हा क्षणात ओसरे

मन भिजले भिजले सवे भिजला पाउस
रात सांगे पावसाला नको एकला गाउस
तिथं छेडलीस तार इथं मीही बिथरले
एक घाव त्या सुराचा माझ्या हृदयात उरे

No comments:

Post a Comment

Popular Posts