Saturday, October 17, 2009

आज असा मला वर द्या…

आज असा मला वर द्या…


नाही माझ्याकडं सागरासारखं गहीरेपण
नाही माझं नदीसारखं निर्मळ दर्पण
या भवसागराचा तुमच्यासारखाच एक थेंब मी
आजन्म मला ईथ सुख-दुख:चा सौदागर होऊ द्या
प्रयत्न करुन मला यश-अपयशाच्या या सागरात पोहु द्या

ऊमलतोय लेखणीचा एक अनोखा गंध घेउन मी
नका लादु आत्ताच नियमांचा असा बंध तुम्ही
रोज नव्या रंगाची उधळण या रानात करायचीये मला
पण त्याआधी मला नीट तरी फ़ुलू द्या
शब्दसौंदर्याने नटलेल्या या जगात मलाही थोडं लिहु द्या

खुललेत आज माझ्यासाठी दार य़ा मोकळ्या नभाचे
फ़ुटलेत आजच पर मला नव्या दमाचे
नियमाच्या कात्रीने नका हो त्यांना असे कापु
एखाद्या नकोश्या फ़ांदीसारखा नका हो मला असे छाटू

व्हायचय या नीर तळ्याचा खळखळता आवाज मला
चढवायचाय या मनावर आत्मविश्वासाचा नवा साज मला
फ़क्त तुम्ही थोडा उत्साहाचा, विश्वासाचा स्वर मला द्या
“मिळो शिघ्र दर्शन मज विजयलक्ष्मीचे“
आज असा मला वर द्या…….आज असा मला वर द्या…

No comments:

Post a Comment

Popular Posts