Saturday, October 17, 2009

कविता अशी-अशी असावी…

कविता अशी-अशी असावी…

कविता एक स्पंदन असते
कधी कधी रणकंदन असते
कविता अशी-अशी असावी
असे काही बंधन नसते

कधी अंतरातले र्हुदगत असते
कधी स्वत:चिच फसगत असते
घनदाट जंगल माजलेले कधी
कधी सुबकशी मशागत असते

चांदणं,आकाश,फुले असते
वेश्यावस्तीतील मुले असते
स्वर्ग काय अन नरक काय
कवितेला सारेच खुले असते

मोजुन मापुन जोडलेली असते
सफाईदारपणे खोडलेली असते
कधी अंगावरच येते जशी..
धरणाची भिंतच फोडलेली असते

ईश्वराला केलेले वंदन असते
देहाने केलेले आक्रंदन असते
कविता अशी-अशी असावी
असे कुठलेच बंधन नसते

No comments:

Post a Comment

Popular Posts