Saturday, October 17, 2009

आनंदकंद ऐसा, तो राम नित्य आहे ।

आनंदकंद ऐसा, तो राम नित्य आहे ।

भक्तांस धीर देण्या, तो राम नित्य आहे ।

दाही दिशाच होती, विक्राळ काळ जेव्हा,

तू घाबरू नको रे, तो राम नित्य आहे ।

एकेक पान लागे, देठातुनी गळाया,

नाहीस एकटा रे, तो राम नित्य आहे ।

या बेरजा जरीही, शुन्यास दाखवीती,

शुन्यातही परंतु, तो राम नित्य आहे ।

भांबावलास का तू, संसारसागरी या,

आदर्श सर्वकाळी, तो राम नित्य आहे ।

दे टाकूनी मनाचे, दौर्बल्य लाजिरे हे,

पाठी तुझ्या सदा ही, तो राम नित्य आहे ।

(सौ. शैलजा शेवडे)

No comments:

Post a Comment

Popular Posts