Saturday, October 17, 2009

एक शापीत मेघ मी…

एक शापीत मेघ मी…

सार्या उदास वाटा कापीत चाललो मी,
होऊन मेघ काळा शापीत चाललो मी

झाले उन्हाळे अनेक, ओसाड उदास राने
ओल्या अधीर धारा कुरवाळीत चाललो मी

श्रुंगार झडून गेला, गर्भगळीत निस्तेज वृक्ष
पानगळीत गुंतलेला श्वास शोधीत चाललो मी

झाले आप्त ही परके, उदास विराण घरटे
दाहक अंतरातला दूरावा तोडीत चाललो मी

पसरला गहिरा अंधार, झाकोळला आसमंत
दिशाहीन प्रवासात वाहवत चाललो मी

- गणेशा … एक शापीत मेघ

No comments:

Post a Comment

Popular Posts