Saturday, October 17, 2009

याचि देही… याची डोळा…

याचि देही… याची डोळा…

तुझ्या पुष्ट सौष्ठवावर
नजरेनेच हात फ़िरवता
फ़िरवता
मी डोळे मिटून ती गोलाई अनुभवतो.




O मी डोळे मिटले की
O अंतरही मालवते
O आणि अंतर्गीत उमलते
O अंतर्गती उफ़ाळून येते
O मनसोक्त दृष्यं लवलवतात
O अभिसरण उसळतं धमनीतून
O धग जाणवते
O रग जाणवते
O घनघोर धबधबे
O भिल्लाच्या राकट खांद्यादंडासारखे
O उसळतात उधळतात
O खालून वर कारंजी उचंबळतात
O सर्वांग थर्थरतं
O मेंदू झणाणतो
O छातीचा भाता फ़ुटणार आता
O शिवमणीच्या ड्रमसारखा
O धप्प धप्प धम्म धम्म
O पखावजाचा धधत्कार
O रतगंधाराचे सूर
O चिकट मधुर


मी डोळे उघडतो
समोर सारं तसंच
संथ
शांत
निर्जीव
सपक
आणि तुझं निर्मळ स्मित

—–टल्ली

No comments:

Post a Comment

Popular Posts