Saturday, October 17, 2009

कवितेची विशेषणे !

कवितेची विशेषणे !

एकदा वाचुन
पटकन कळते
सोपी कविता…
दोनदा वाचुन
मनात नाचते
साधी कविता…
वाचुन मनात
उच्छाद मांडते
मस्त कविता…
वाचता वाचता
गुणगुण गाते
झक्क कविता….
वाचुन कळते
नंतर वळते
मुग्ध कविता..
लगेच वाचते
मनात साचते
शब्द कविता….
नकळत कळते
कळुनही पळते
गुढ कविता…..
वाचताना हसते
चंचल दिसते
रम्य कविता…..
शब्दात जगते
शब्दाला जागते
अर्थ कविता…..
विदीर्ण करते
मन कुरतडते
शून्य कविता….

No comments:

Post a Comment

Popular Posts