Saturday, October 17, 2009

होय..! मी क्रौर्य केलयं..!

होय..! मी क्रौर्य केलयं..!


अनंत शारीरिक, मानसिक यातना भोगतांना,
मी स्वतःला प्रश्न करत राहिले,
मी कुणाला कधी लुबाडले नाही,
कधी कुणाचं वाईट चिंतिलं नाही,
ईश्वरसाक्षी आहे, मी खरं सांगतेयं !

मग ही शिक्षा कशासाठी भोगतेयं?
अचानक माझ्या डोळ्यापुढे आले,
ते मुके जीव..झुरळ, गांडूळ, बेडूक,
ज्यांना मी हाल हाल करत मारले होते.
होय…! मी क्रौर्य केलं होतं !

एकनाथ, ज्ञानेश्वरांच्या या देशात,
माझ्याकडून क्रौर्य करवून घेतले गेले होते,
अभ्यासक्रमात, डिसेक्शनच्या नावाखाली..!

क्लोरोफॊर्म देऊन, ट्रे मध्ये बांधलेले जीव,
धडधड करत उडणारी त्यांची इवली हृदयं..
मी त्यांची त्वचा कापली, रक्तवाहिन्या कापल्या,
त्यांच्या शरीराचा अभ्यास करायला..!

परत त्वचा शिवली नव्हती…
ऒपरेशन थोडेच होते? डिसेक्शन होते..!
त्यांची तडफडणारी शरीरं, कच-यात टाकली.!
त्यांचा शाप भोगतेयं का?

No comments:

Post a Comment

Popular Posts