Saturday, October 17, 2009

मारव्यातून भैरवाकडे

मारव्यातून भैरवाकडे

सादळलेली स्वप्नं तशीच
उरलेली मलूल डोळ्यात
उमलायची ध्येयं तशीच
विरलेली म्लान कळ्यात
धुरकटलेल्या क्षणांवर
पांघरुण जणू विस्मृतीचं
भिजकटलेल्या आशांवर
परिधान चढे जागृतीचं
काही घुसमटलेले श्वास
काही जळमटलेले उदास
थोडी चिडचिड थोडी तडफ़ड
मेंदूत अखंड होणारी वळवळ
पाठीशी असणारं तेजोवलय
पुढे दिसणारं गहिरं तमालय
अस्वस्थ करणारी बेचैनी
ओठी उरणारी करूण विराणी
तरी क्षितिजावरचे तांबडे भास
उरलेले प्राण फ़ुंकून उठायचे प्रयास
सारे काबीज करण्याचे वेडे ध्यास
मारव्याला दूर सारून भैरवाचे श्वास

No comments:

Post a Comment

Popular Posts