Saturday, October 17, 2009

मुळाकडे

मुळाकडे
——–

सोपविला भार
तुझ्यावर आता
तूच एक त्राता
दयानिधी

तुझ्याच छायेत
विसरला शिण
उरले न हिण
देहामाजी

धरणी उशाला
आकाशाचि शाल
प्रणवाचा ताल
कानावरी

तुटुनिया गेले
पाश संसाराचे
विश्व हे घराचे
रुप झाले

हात हे मोकळे
तुला वंदावया
धन्य झाली काया
तुझ्या पायी

आनंदाने जड
विलोप पावले
झाड झेपावले
मुळाकडे

No comments:

Post a Comment

Popular Posts