Saturday, October 17, 2009

जिजाई …!

जिजाई …!


रायगडावर गेले तेव्हा पायथ्याशी
जिजामातेचं मंदिर दिसलं
त्या मातेच्या महान कर्त्रुत्वापुढे
मस्तक आपसुकच तिच्या चरणाशी झुकलं
तिनेही मग दिला आशीर्वाद तोंडभरून ….म्हणाली…
समाजात थकलेल्या ,सदा भुकेल्या
लोकांच्या पुढयातलं
समाधानाच्या अन्नाच ताट हो
भरकटलेल्या तरुणाना मार्गावर आणेल
अशीच तू एक वाट हो…
अनाथ म्हणुन हीणवल्या गेल्यांची
बनून बघ एकदा आई
आणि त्यातूनच
स्वराज्यानंतरचं ‘सुराज्य’ साकारू शकेल
असा शिवाजी घडवणारी
तुसुद्धा हो गं जिजाई
तुसुद्धा हो गं जिजाई …!

माहिती आहे ..स्वप्न आहेत
खुप खुप मोठी …तरीही
हात घालेन तिथे
घवघवित यशच लागाव हाती
असा कही माझा हट्ट नाही
पण म्हणुन “मला कसं जमणार ??”
म्हणत हातावर हात धरून
स्वतःपुरतच सावरून बसेन
इतकीसुद्धा काही मी निगरगट्ट नाही
इतकीसुद्धा काही मी निगरगट्ट नाही …!

No comments:

Post a Comment

Popular Posts