Saturday, October 17, 2009

पौरुष

पौरुष

माझ्या गुळगुळीत चेहर्‍या आडचं
खरंखुरं खरखरीत पौरुष
रासवट, राठ
उधळून लावतं सारी बंधनं
धस्सकन उभं रहातं चॅलेंज देत
उसळून येतं रासवटासारखं
ठिकर्‍या उडवतं सीमांच्या

धमनीतून उधळतात
रेसाळणारे घोडे
शुभ्र आयाळ फ़िस्कारत
रंफ़ाट

मेंदूच्या नसांतून
डरकाळतो बिबट्या
००००००००त्याला सावज हवंय
०००००कचाकच चावून खायला
०००कच्चं

हे श्वापदा००० बघ
ती येतेय
००० दबा धर
भरदार खांदे उंच कर
छातीत श्वास भर ००० रोखून धर
००० रोखून धर नजर
मान खाली असली तरी
पापणी लवू देवू नकोस
पाप लपू दे पापणी आडचं…

नखं घे आत
जिभेवरची लाळ लपक
लपलपणारी जीभ आवर
झपट
झपट, लपक
धत्तींग धत्तींग कर
हो वीज
थरारून सोड
समोरच्या सावजाचा थरकाप होऊ दे
सावज पडेल मलूल होऊन अचल
शक्तीहीन

चवीचवीने ताव मार
आधी मन कुस्कर
००० मग घे घोट तिच्या इच्छांचा
चघळ स्वप्नं आणि थुंकून टाक पचकन

उरलेल्या कलेवराला
असलीच जर काही धुगधुगी
तर बदनाम कर
फ़ास चिखल तिच्या तोंडाला

अणि मागे फ़ीर
छाती पुढे काढून
धीमी पावलं टाकत
नीघ
नव्या सावजाच्या मागाव्रर

- टल्ली

No comments:

Post a Comment

Popular Posts