Saturday, October 17, 2009

सूर्य तापतोय… सूर्य तापवतोय

सूर्य तापतोय… सूर्य तापवतोय


सध्या रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामं सुरू आहेत. रोज या कामांकडं पाहताना अस्वस्थ होतं. आणि…

सूर्य तापतोय
सूर्य तापवतोय
त्यांच्यासाठी
हे दिवस
`समरकॅंम्प`चे
कुणाला ओढ
स्विमींगची

हेच ऊन
घेत असतं
कठोर परीक्षा
आमच्या
जगण्याची
पत्रे तापतात
धारा अखंड…

उन्हात राबण्याचं
प्राक्तन कोरलेलं
आमच्या पुढ्यात
कधीचं नसतं
“एसी’त वावरण्याचं
थंडगार स्वप्न,
का, कुणास ठाऊक?

रस्त्याच्या कामवर
खडी फोडताना
फुटत असतात
हाताची फोडं
घामात न्हाताना
त्यांच्या वेदना
रून गेलेल्या

सूर्य कलतो
वेध परतण्याचे
घराच्या भिंती
भाजलेल्या
अन्‌ भाजणाऱ्या
घागरीततलं
पाणी तापलेलं…

उन्हाळच्या नावानं
सुटी नसते
एखादा उन्हाळा
बघाकी असा अनुभवून
सुटी न घेता,
स्विमिंगला न जाता,
“एसी’त न बसता
आणि
घागरीतलं पाणी पिऊन…

No comments:

Post a Comment

Popular Posts