Saturday, October 17, 2009

स्वातंत्र्यसंग्रामाचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव [स्मरण १८५७ चे]

स्वातंत्र्यसंग्रामाचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव [स्मरण १८५७ चे]


देशासाठी, धर्मासाठी
मातीवरल्या प्रेमापोटी
सुटली मंगलची गोळी
तेजातुन त्या रक्त चमकले
चारी दिशांनी मंगलच्या
नंतर त्याच गिरविल्या ओळी

बंडखोरीचा वार होताच
गो-यांनी त्रागा केला
गर्जुन उठत्या ठीणगीने
सारा देश जागा केला

चेतसिंह, तात्या
सुलतान टीपु
पेटुन उठले सारे वीर
तलवारींसह विजा चमकल्या
अंगी खवळले तप्त रुधीर

कर्नाटक, प्लासी,
अवध,दख्खन,अन झाशी
डोळे पुसणारी गंगा दिसली
तेजाळली तव आशा नवी
नव्या उषेची कीरणे हसली

देशावरच्या, मातीवरच्या
प्रेमाचे त्यांनी दिले दाखले
आईवरली ती प्रीत पाहुनी
क्षणभर गोरे ईंग्रज वाकले

ही शब्दांजली त्या हुतात्म्यांना
ज्यांनी स्वातंत्र्याचे स्वप्न दिले
मातीच्या जखमांचे ऋण फ़ेडाया
ज्यांनी वाहिली प्राण फ़ुले…

१८५७ चा ऊठावाला १५१ वर्ष पुर्ण होत आहेत. ईंग्रजांच्या अन्यायाविरुध्द बंडाला सुरुवात येथुनच झाली. त्या लढ्यात मरणाला कवटाळुन आपल्या देशासाठी आणि धर्मासाठी लढणा-या महान आत्म्यांना ही मानवंदना. त्यांचं आज स्मरण करुन त्यांना वाहीलेली ही शब्दांजली. जय हिंद !! जय महाराष्ट्र !

No comments:

Post a Comment

Popular Posts