*आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं*
*अजुनही मला आठवतंय….
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरुन कंटाळा आला की
परत College कडे वळायचो*
*Canteen वाल्याला शिव्या घालत
बाहेरच्या café मध्ये जायचो
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो*
*Library card चा तसा कधी
उपयोग झालाच नाही
Canteen समोरच असल्याने
Library कडे पावलं कधी वळलीच नाहीत*
*आमच्या group ला मात्र
मुलींची तशी allergy होती
कदाचीत college कडून ती
आमच्या group ला झाली होती*
*चालु तासाला मागच्या बाकावर
Submission copy करायचो
ज्याची copy केली आहे त्याच्या
आधीच जाउन submit करायचो*
*खुप आठवतात ते दिवस…
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की
डोळ्यात टचकन् पाणि येतं…………* .
--
(¨`·.· ´)
`·.¸.·´
No comments:
Post a Comment