Thursday, November 18, 2010

बागलकोट (कर्नाटक)मध्ये शासनाच्या कारवाईत ३४ मंदिरे उद्ध्वस्त !

भाजप शासनाचा धर्मद्रोह !
    बागलकोट (कर्नाटक), १७ नोव्हेंबर - मंदिरे अनधिकृत ठरवून ती तोडून टाकायच्या कर्नाटक शासनाच्या एकतर्फी कृतीला हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार विरोध करत शहरात बंद पुकारला. हिंदुत्ववादी संघटनांच्या या बंदच्या चळवळीत भाग घेतलेल्या हिंदुत्ववाद्यांवर पोलिसांकडून अत्याचार करण्यात आले. दुचाकी वाहनांवरून आलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना वल्लभभाई चौकात अडवून पोलिसांनी त्यांच्यावर लाठीहल्ला केला. या लाठीहल्ल्यात दोन कार्यकर्ते घायाळ झाले. कडक बंदोबस्तात करण्यात आलेल्या कारवाईत दिवसभरात ३४ मंदिरे जमीनदोस्त करण्यात आली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
(भाजपच्या राज्यातील हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असता त्यांनी कोणाकडे दाद मागायची ? राजकारणात सर्वच राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी असल्य [...]

No comments:

Post a Comment

Popular Posts